जाहिरात... Advertisement... विज्ञापन

कोंढेगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गो-हा जखमी. #Attack


बैलानेच हुसकावून लावले वाघाला; परिसरात दहशतीचे वातावरण.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या कोंढेगाव (माल) येथील आदिवासी शेतकरी रवींद्र चौखे यांचा गो-हा वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याने कोंढेगाव परिसरात ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.
दि.९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान रवींद्र चौखे आपल्या शेताला लागून असलेल्या अनिल जांभुळे ‌यांच्या शेतात गुरे चारत असताना पट्टेदार वाघाने अचानक हल्ला केला. त्यात त्यांचा एक गो-हा जखमी झाला. गो-ह्यावर हल्ला केल्याचे लक्षात येताच कळपातील एका बैलाने वाघावरच हल्ला चढविला.तसेच तेथे उपस्थित गुराख्यांनी आरडाओरड करताच वाघाने तेथून पळ काढला.
वाघाच्या हल्ल्यात गो-हा जखमी झाल्याने रवींद्र चौखे यांचे जवळपास २५ ते ३० हजारांचे नुकसान झाले आहे.वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करुन परिसरातील नागरिकांना भयमुक्त करावे. तसेच रवींद्र चौखे यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत