जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पोंभूर्णा शहरातील दुकाने कडकडीत बंद. #Pombhurna

महाविकास आघाडीच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसा
पोंभूर्णा:- उत्तर प्रदेशातील लखिमपुर येथे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या हीताचा नसलेला कायदा रद्द करण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांचा शांतताप्रिय आंदोलन सुरू आहे.
आंदोलनकर्त्या चार शेतकऱ्यांना भाजप सरकार कडून चिरडून टाकल्याच्या निषेधार्थ तसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना तुरुंगात डांबले याचा आरोप करीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ने महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्या निषेधार्थ ११आक्टोंबर सोमवारला महाविकास आघाडी तर्फे पोंभूर्णा शहरात बंदचे आवाहन करण्यात आले. बंदच्या आवाहनाला व्यवसायिकांनी प्रतिसाद देत प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून बंदला सहकार्य केले.
यावेळी कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष कवडू कुंदावार,शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजय ढोंगे, शिवसेना तालुका समन्वयक विजय वासेकर, न.पं.चे माजी गटनेते अतिक कुरेशी, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भुंजग ढोले, युवासेना तालुका प्रमुख अभिषेक बद्दलवार, काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष दत्तू येलूरवार, ईश्वर पिंपळकर, गजानन सेमले, जयंत टेकाम, महेश श्रिगिरिवार, अशोक सातपुते, जयपाल गेडाम, किशोर डाखरे, गणेश दिवसे, रवी ठेंगने, अन्शुल मोरे, अक्षय व्याहाडकर आदी महा विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत