🌄 💻

💻

दोन गॅंगमधील सराईतांचा भरदिवसा एकमेकांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू. #twogangs #shoot #Death


पुणे:- पुणे जिल्ह्यातील उरळीकांचनमध्ये गँगवारमधून दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना समोर आली आहे. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. भर रस्त्यावर घडलेल्या या थरारक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून लोणीकाळभोर परिसरातील उरूळी कांचन येथील तळवेडे चौकात गोळीबाराची ही घटना घडली आहे. या गोळीबारात संतोष जगताप याचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हॉटेल सोनईसमोर ही घटना घडली.
संतोष जगताप हा वाळू व्यावसायिक होता. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनईसमोर चर्चा करत होते. त्याचवेळी तिथे पाच जणांनी संतोष जगताप यांच्यावर हल्ला चढवला. या हल्लोखोरांनी तीक्ष्ण हत्यारासह हल्ला चढवत गोळीबार केला. यात संतोष जगताप हे गंभीर जखमी झाले. त्यांचे अंगरक्षकही जखमी झाले. पण जखमी अवस्थेत संतोष जगताप यांनी हल्लेखोरांवर प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर हा ठार झाला तर बाकीचे हल्लेखोर पळून गेले आहे.
संतोष जगताप आणि त्यांच्या जखमी अंगरक्षकांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु, उपचारापूर्वी संतोष जगताप यांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत