आदर्श शिक्षक संदीप बोगावार यांचे निधन. #Death

Bhairav Diwase

मूल:- आदर्श शिक्षक संदीप नारायण भोगावार, वय ५१ वषं यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मरेगाव तालुका मुल येथे कार्यरत होते. उच्च शिक्षीत संदीप बोगावार यांचे काल दिनांक 22 ऑक्टोंबर 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले.
त्यांची अंतिम यात्रा आज दिनांक 23 ऑक्टोंबर 2021 रोज शनिवार ला त्यांचे राहते घरून दुर्गा मंदिर समोरून चंद्रपूर रोड वरून निघून उमा नदीच्या घाटावर करण्यात येणार आहे. त्यांचे निधनाबद्धल हळहळ व्यक्त होत आहे.