Top News

तंटामुक्ती समिती ने पकडली अवैध दारू. #Sindewahi

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी इथे ग्रामसभेत संपूर्ण गावात दारू बंदी चा ठराव पारित करण्यात आला.व गावातील अवैध दारू विक्रेत्यांना तंटा मुक्त समिती ने गावात दारू विक्री करू नये म्हणून नोटीस बजावल्या पण या नोटीस ला न घाबरता या अवैध दारू विक्रेत्या कडून दारू विक्री आणखी जोरात सुरू आहे. तंटा मुक्ती समिती मधील सदस्य आत्ता मैदानात उतरून गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्ती च्या मुसक्या आवळण्यात सुरवात केली आहे.

दिनांक २२/ १०/२०२१ च्या रात्री ८:०० वाजता च्या सुमारास राजू भसारकर नामक व्यक्त अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती तंटा मुक्त समिती ला मिळाली. व सिंदेवाही पोलिस प्रशासन च्या मदतीने राजू भसारकर यांच्या घरी धाड टाकण्यात आली. या मध्ये देशी दारू ( संत्रा) च्या ९० मिली च्या एकूण ३५ बाटला एकूण १४०० रू किमतीचा दारू साठा आढळला व संबधित पोलिस प्रशासनाने हा माल जप्त केला असून संबधित व्यक्तीवर गुन्ह्याची नोंद केली आहे. 

या अवैध दारू विक्रेत्या ला पकडण्यात सिंदेवाही पोलिस स्टेशन मधील पोलिस निरीक्षक श्री घारे साहेब यांच्या मार्गदर्शनात प्यारेलाल बांबोळे, सतीश निनावे, व पोलिस मित्र वासेरा सुभाष मेडीवार यांनी कारवाई केली. व ही  अवैध दारू विक्री  पकडण्यात तंटा मुक्ती समिती  मधील अध्यक्ष अंबादास चौके , सदस्य गणपत वणस्कर, भैयाजी मानकर,  सदस्य पत्रकार प्रतिनिधी  सुनिल गेडाम, सदस्य नरहरी डांगे, रामचंद्र नन्नावरे, भीमराव नागदेवते, पो.पा .रुपेश नागदेवते, व सदस्या सौ भारती चहांदे  यांनी प्रत्यक्ष अवैध दारू पकडण्यात मदत केली आहे. तरीही आज लाडबोरी गावात तंटा मुक्ती समिती समोर या अवैध धंद्याचे आव्हान आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने