ट्रेनसाठी पोस्टकार्ड पाठवा मोहिमेला जोरदार प्रतिसाद. #Ballarpur


हजारो लोकांनी दिला पाठिंबा.
बल्लारपूर:- बल्लारपूर, चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी असो.च्या वतीने प्रवाशांच्या विविध मागण्या व विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पत्रव्यवहाराद्वारे जनआंदोलन करण्यात येत आहे.
बल्लारशाह ते मुंबई संध्याकाळी स्वतंत्र ट्रेन, सकाळी बल्लारशाह ते भुसावळ फास्ट पॅसेंजर चालवा, काझीपेठ पुणे ट्रेन आठवड्यातून तीन वेळा, नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाहवरून सुरू करा, भाग्यनगरी एक्स्प्रेस बल्लारशाह पर्यत चालवा, चांदाफोर्टपर्यंत येणारी गोंदिया पैसेंजरला बल्लारशाह पर्यंत वाढवावी या मागणीसाठी बल्लारपूर नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला नागरिकांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत हजारो नागरिकांनी पोस्टकार्डवर स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शविला. यावेळी हजारो पत्रकांचे वाटपही करण्यात आले.
वरील मागण्यांचे जनतेच्या स्वाक्षरी असलेले पोस्टकार्ड माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार सुधीर मुनगंटीवार, रेल्वे बोर्ड अध्यक्ष, रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना पाठविण्यात येणार आहेत.
या मोहिमेत संघटनेचे अध्यक्ष व ZRUCC सदस्य श्रीनिवास सुंचुवार, संघटनेचे उपाध्यक्ष व DRUCC सदस्य विकास राजूरकर, सहसचिव व स्टेशन सल्लागार समिती सदस्य गणेश सैदाणे, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, ज्ञानेंद्र आर्य, रामेश्वर पासवान, राकेश बुरडकर, जगदीश परदेशी, किशोर परदेशी, डॉ. इटनकर, सुधाकर पारधी, सुरज वाकुडकर, नितेश नायडू, रमेश निषाद, विजय तोटावार, शुभम बहुरिया, कुलदीप सुंचुवार, संजय पारधी, प्रवीण राऊत, प्रेम यादव, ज्ञानेश्वर उद्रके, दिनेश केशकर, आनंद तिवारी, राजनाथ तिवारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत