Click Here...👇👇👇

व्यायाम करण्यासाठी जाणे बेतले जीवावर. #Accident

Bhairav Diwase
1 minute read

3 युवकांना अज्ञात वाहनाने चिरडले.
एकाचा जागीच ठार; तर दोन गंभीर जखमी.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- हिवाळ्याचे दिवस सुरू झाल्याने अनेक मुल व्यायाम करण्याची जात असतात, आज पहाटे च्या सुमारास व्यायाम करण्यासाठी जाणे जीवावर बेतले आहे.

सावली तालुक्यातील व्याहड बूज येथील 3 युवकांला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक ईतकी जोरदार होती कि त्यात दिपक दादोरीया या युवकाचा घटनास्थळीच ठार झाला तर अंकुश सोयाम, अक्षय रामटेके (व्याहाड बूज.) हे गंभीर जखमी झालेले आहे.
ही घटना आज सकाळी घडली असून हे ३ मुलं सकाळी चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर फिरायला गेले असता चूनारकर धाबा या जवळ अपघात झाला. सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आलेली आहे.