गुंजेवाही येथे भव्य विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर. #Sindewahi

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्थीती निमित्ताने १४ नोव्हेंबर शिबिराचे नियोजन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- मागील २ वर्षापासून कोरोनाच्या संक्रमनामुळे मोतीबिंदू शिबिराच्या माझ्या अखंडित १५ वर्षाच्या परंपरेला खंड पडला. परंतु आता परिस्थिती थोडी निवळली आहे. शासनाच्या निर्देशानुसार सर्व सार्वजनिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. तरी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्य सेवाग्राम मेडिकल कॉलेज,सेवाग्राम ,लायन्स क्लब चंद्रपूर ,प्राथमिक आरोग्य केंद्र गुंजेवाही,श्री.गुरुदेव सेवा मंडळ गुंजेवाही ,तालुका काँग्रेस कमेटी सिंदेवाही आणि श्री रमाकांत श्रीधरराव लोधे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१४ नोव्हेंबर २०२१ , सकाळी ११ वाजता श्री. गुरुदेव सभागृह, गुंजेवाही येथे " भव्य विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे " आयोजन केले आहे. तरी गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत