माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज भय्या अहिर यांच्या जन्मदिनी भाजपा राजुरा तालुक्याच्या वतीने सेवादीन.#BJP

स्पर्धा परीक्षा अभ्यासक विद्यार्थ्यांना पुस्तके, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप तथा अनाथ आश्रमातील मुलांना स्वेटर वाटप.

जी. प. कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकूडे व नगरसेवक राजू डोहे तथा भाजपा राजुरा तालुका व शहर यांचा पुढाकार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज दी. ११/१२०२१ ला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज भय्या अहिर यांच्या वाढदिसानिमित्त भाजपा राजुरा तालुक्याच्या वतीने विविध सेवा उपक्रम राबविण्यात आले.


      प्रथम भाजपा कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापून दीर्घायुष्य लाभावे करीता प्रार्थना करण्यात आली. तसेच ग्रामीण भागातील वाचनालय करीता नगरसेवक राजू डोहे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
    त्यानंतर भाजपा राजुरा तालुका व शहर वतीने ग्रामीण रुग्णालय राजुरा रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.


     नंतर अनाथ आश्रम चुणाला, राजुरा येथील मुलांना जी. प. चे कृषी व पशसंवर्धन सभापती तथा भाजपा तालुका अध्यक्ष सुनील उरकुडे यांच्या माध्यमातून स्वेटर चे वाटप करण्यात आले..


      या संपूर्ण सेवादिनी प्रामुख्याने माजी आमदार adv संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, जी. प. कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकूडे, नगरसेवक राजू डोहे, तालुका महामंत्री प्रशांत घारोटे,दिलीप वांढरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, मधुकर नरड, वाघुजी गेडाम, भाजपा युवामोरचा उपाध्यक्ष सचिन डोहे, दिलीप गिरसावळे, मिलिंद देशकर, गणेश रेकलावार, सचिन शेंडे संदीप पारखी, विलास खिरटकर, दीपक झाडे, महादेव तपासे, सचिन सिंह भैस, शिणू पांजा, सुनील लेखराजनी, कैलाश कार्लेकर, अजय बांदुरकर, आकाश गधारे, प्रदीप मोरे, योगेश  येरणे, राजकुमार भोगावार, श्रीनिवास कोपुला, कृष्णा कुंभाला, राजकुमार निषाद, उपस्थित होते.#BJP

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत