चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स गोंडपिपरी येथे भारतीय संविधान दिन साजरा.गोंडपिपरी:- श्री. समर्थ शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायंन्स गोंडपिपरी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय संविधान दिवस आज दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चक्रधर ए. निखाडे यानी भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला आणि स्वातंत्र्यानंतर हा देश एकत्रितपणे व सुसूत्रपणे चालवण्याकरिता लिखित दस्तऐवज पाहिजे होता ते म्हणजे भारताचे संविधान (भारताची राज्यघटना )हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व 26 जानेवारी 1950 पासून भारताची राज्यघटना अमलात आली. 
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहे. देशात संविधान दिवस दरवर्षी उत्साहाने व विविध कार्यक्रमाने साजरा केला जातो असे प्रतिपादन केले.प्रमुख वक्ते श्री. विकास पुणेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर च्या कार्यावर प्रकाश टाकला. 
कार्यक्रमाचे आयोजन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. महेंद्र डी. अक्कलवार आणि प्रा. अविनाश वि. चकिनारपूवार व सहकार्यक्रम अधिकारी प्रा. उमेश वरघणे आणि प्रा. डॉ. रुद्रप्रताप तिवारी यांनी केले. सदर कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग प्रमुख महेंद्र डी. अक्कलवार आणि आभार प्रदर्शन ग्रंथालय प्रमुख कु. नलिनी जोशी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत