पाच दिवसांचा आठवडा; पण अधिकारी, कर्मचारी येईना वेळेवर #rajura

राजुरा येथील सावकारांचे निबंधक तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येथील प्रकार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत. शुक्रवारी सकाळी येथील सावकारांचे निबंधक तथा सहायक निबंधक सहकारी संस्था राजुरा या कार्यालयांमध्ये तुरळक कर्मचारी वगळता अनेक जण बारापर्यंतही कार्यालयात अनुपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीने या कार्यालयात फेरफटका मारला असता असे दिसून आले.


या कार्यालयातुन कोणतीही माहिती मागितल्यास संबंधित लिपिक आले नसल्याचे सांगितल्या जाते. माहितीच्या अधिकारा अंतर्गत माहिती मागितली असता माहिती दिली जात नाही असे निदर्शनास आले.
शासकीय कार्यालयात माहिती अपिलीय अधिकारी यांचे नाव व पदाचा उल्लेख असणारा तक्ता टांगलेला असावा असा शासकीय निर्देश असतानाही या कार्यालयात मात्र तक्ता दिसून येत नाही. या संदर्भात विचारणा केली असता थातूरमातूर उत्तरे दिली जातात. यामुळे अर्जदाराला नाहक त्रास सहन करावा लागतो या कडे वरिष्ठ अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालुन सामान्य अर्जदारास माहिती मिळण्यासाठी होणारा विलंब व त्रास दूर करावा अशी सामान्यांची मागणी आहे.#rajura

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत