Top News

पोलीस स्टेशन विरूर व उप-पोलीस स्टेशन लाठी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन. #Diagnosiscamp

मा. अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिक्षक यांचे हस्ते पो.स्टे. विरूर येथे वृक्षारोपन.


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगतसिंग वधावन, विरुर स्टेशन
विरूर स्टे.:- दि . २४/११/२०२१ रोजी पोलीस स्टेशन विरूर येथे पोलीस स्टेशन विरूर व उप पोलीस स्टेशन लाठी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोगनिदान शिबीर घेण्यात आले.


मा. अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे हस्ते पोस्टे विरूर येथे वृक्षारोपन करण्यात आले तसेच पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण ग्राऊंडचे उद्घाटन करण्यात आले. यात पोस्टे हद्दीतील पोलीस भरती प्रशिक्षण घेणाऱ्या मुला मुलींनी सहभाग दर्शविला होता . रोगनिदान शिबीर कार्यक्रमात पोस्टे हद्दीतील १००० ते १२०० लोकांनी सहभाग घेतला असून त्यापैकी १०१५ लोकांनी डॉक्टर याचेकडून योग्य उपचार घेतलेला आहे .


कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर हे हजर होते. तसेच पोलीस स्टेशन विरूर ठाणेदार सपोनि श्री राहुल चव्हाण व उप पोलीस स्टेशन लाठी येथील ठाणेदार सपोनि फाल्गुन घोडमारे हजर होते. कार्यक्रमाला तज्ञ वैद्यकीय अधिकारी म्हणून मा. डॉ. टी. कुळमेथे, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, राजुरा, मा.डॉ. अभय मुन वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली मा.डॉ. इलीजाबेथ जोसेफ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता आरके (कुळमेथे), वैद्यकीय आशाधाम हॉस्पीटल विरूर मा डॉ. संदीप बांबोळे, अधिकारी/स्त्री रोग तज्ञ उपजिल्हा रुग्णालय, राजुरा मा. डॉ. स्नेहल डाहुले, वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ प्रा.रू. गोंडपिपरी मा वैद्यकीय अधिकारी प्राथ. आरोग्य केंद्र तोहगाव हे उपस्थित होते.#Diagnosiscamp

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने