देवराव मामाच्या वाढदिवसाला शेकडो "भाचे" करणार रक्तदान. #Blooddonation

राजुरा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन; सर्वपक्षीय युवक आले एकत्र.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- तालुक्यातील युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले देवराव मामा त्यांच्याप्रती असलेली आपुलकी दाखवित शेकडो भाचे एकत्र येत आपल्या आवडत्या मामाच्या वाढदिवस २१ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० वाजता राजुरा येथील सुपर मार्केट हॉल येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करीत लाडक्या मामाला वाढदिवसाची भेट दिली आहे.
राजुरा तालुक्यातील युवकांचे मामा म्हणजे भाजपा चे जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य देवराव भोंगळे हे मागील दहा वर्षांपासून तालुक्यातील युवकांच्या संपर्कात असून त्यांना मानणारा सर्वपक्षीय युवावर्ग मोठ्याप्रमाणात आहे. तालुक्यातील युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामुख्याने ते समोर असतात त्यामुळे त्यांना मानणारा युवा वर्ग राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे.
भोंगळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांची जनतेशी नाळ जुडलेली आहे. स्पष्ट बोलणे आणि तात्काळ समस्येचे निराकरण करणे या त्यांच्या गुणधर्मामुळे ते लवकरच जनसामान्यांत लोकप्रिय झाले यामुळेच त्यांच्या कार्यालयात नेहमीच नागरिकांची उसळलेली गर्दी पाहायला मिळत असते. याच लोकप्रियतेतून देवराव मामा यांच्या शेकडो भाच्यांनी रक्तदान शिबिरासह इतर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
राजुरा येथील सर्वपक्षीय देवराव भोंगळे यांच्या चाहत्या युवकांनी आपल्या लाडक्या मामाच्या वाढदिवसा निमित्य रक्तदान शिबीराचे आयोजन (दि. २१) केले आहे, या रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवराव मामा यांच्या मित्रमंडळाकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत