चंद्रपुरात अनेक ठिकाणी विज बिल न मिळाल्याने नागरिक त्रस्त. #Chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- शहरांमध्ये राष्ट्रवादी नगर, वृंदावन नगर, एसटी वर्कशॉप, तुकुम तलाव व शिवाजीनगर या भागात विज बिल देयक न मिळाल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. याचे कारण असे की, नागरिकांना वेळेत बिल देण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना दोन महिन्याचे वीज बिल भरणे शक्य झाले नाही. तसेच मीटर वाचन बरोबर झाले नाही.
    काही नागरिकांना एव्हरेज रीडिंग बिल देण्यात आले. सोबतच MSEDCL च्या विरोधात दिवसेंदिवस नागरिकांच्या तक्रारी सुद्धा वाढत आहे. त्यामुळे MSEDCL ने नागरिकांच्या समस्यांकडे जास्त लक्ष द्यावे, एजन्सीकडे नाही. असे आवाहन भाजपाचे चंद्रपूर जिल्हा महामंत्री, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी MSEDCL ला केले.