Click Here...👇👇👇

धानाच्या पुंजण्याला अज्ञाताने लावली आग. #Fire

Bhairav Diwase

आगीत संपूर्ण धान जळुन खाक.
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी परीसरात पुडंलीक गुरनुले या शेतकऱ्याच्या धानाच्या पुंजण्याला अज्ञाताने आग लावल्याने संपूर्ण धान जळून खाक झाले आहे.
डोंगरहळदी येथील पुडंलीक गुरनुले यांनी धान कापणी करून शेतातच पुंजणा (ढीग) तयार करून ठेवला होता. दि. 10 नोव्हेंबरला दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पुंजण्याला आग लावली. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण धान्य जळून खाक झाले. यामुळे पुडंलीक यांना आर्थिक नुकसान झाले असून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. पोलीसांना घटनेची माहिती मिळताच उमरी पोतदार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सध्याची राज्यातली परिस्थीती शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना अशी आहे . परिणामी अतिवृष्टी, कर्जाचा डोंगर, सरकार आणि विमा कंपन्यांकडून दुर्लक्ष! या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक हेळसांड सहन करावी लागत आहे.