Top News

सोयाबीनच्या ढिगाऱ्याला लागली आग. #Fire

आगीत संपूर्ण सोयाबीन जळुन खाक.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- सध्याची राज्यातली परिस्थीती शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना अशी आहे. परिणामी अतिवृष्टी, कर्जाचा डोंगर, सरकार आणि विमा कंपन्यांकडून दुर्लक्ष! या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक हेळसांड सहन करावी लागत आहे. यातच जिवती तालुक्यातील कुभेंझरी गावातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला आग लागल्याने संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले आहे.

कुभेंझरी येथील तुकाराम पवार यांनी आपल्या शेतात ७ बॅग सोयाबीनची कापनी करुन एका जागी जमा करुन ढिगारा केला होता. दि. 18 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजताच्या सुमारास सोयाबीनच्या ढिगाऱ्याला आग लागली. आग इतकी भीषण होती की काही वेळातच अदांजे 45-50 क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले. या मुळे तुकाराम पवार यांना आर्थिक नुकसान झाले असून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने