💻

💻

C-60 कमांडोचा जल्लोषाचा "तो" व्हिडिओ आताचा नाही, जुना आहे. #Gadchiroli


जुना व्हिडिओ
नवी दिल्ली:- विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे ज्यामध्ये C60 कमांडो जल्लोष करताना दिसतात. कुख्यात नक्षलवादी, मिलिंद तेलतुंबडे आणि इतर २६ नक्षलवाद्यांच्या चकमकीनंतर C-60 कमांडोंनी केलेला हा जल्लोष असल्याचा दावा पोस्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र, व्हायरल व्हिडिओचा सध्याच्या घटनेशी संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?

फेसबुक वापरकर्त्या सूरज लोहारने 30 सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आणि मराठीत लिहिले: कुख्यात नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे आणि २६ लाल माकडांचा एन्काऊंटर अनिवार्य महाराष्ट्र पोलीस दलातील C60 कमांडो जल्लोषी स्वागत. C60 #गडचिरोली

हाच दावा जम्मू-काश्मीर भाजपचे कार्यकारिणी सदस्य रमण सुरी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. रमण सुरी यांच्या पोस्टवरील कंमेंट्स बघून तपास सुरू केला. पोस्टला 33 रिट्विट्स आणि 187 लाईक्स मिळाले.


तपास:-

आम्हाला गडचिरोली पोलिसांचे एक ट्विट देखील सापडले ज्यामध्ये म्हटले आहे की व्हिडिओ सध्याच्या घटनेशी संबंधित नाही.


आम्हाला गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यांचे ट्विट देखील सापडले.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यांनी सांगितले की हा व्हिडिओ अलीकडील नाही आणि सध्याच्या चकमकीशी संबंधित नाही.

निष्कर्ष: C60 कमांडो चा जल्लोष करतानाच व्हिडिओ आताचा नाही, जुना आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत