कलम 144 जमावबंदी आदेशानुसार वढा येथील यात्रा महोत्सव रद्द.
चंद्रपूर:- वर्धा, पैनगंगा आणि निर्गुडा नदीच्या त्रिवेणी संगामावर वढा येथे दरवर्षी आषाढी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही यात्रा मागील वर्षी व यावर्षी सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
वढा येथे विठ्ठल रुख्मिणीचे पुरातन मंदिर असल्यामुळे आणि त्रिवेणी नदीच्या संगामावर हे मंदिर असल्याने यात्रेसाठी विदर्भातील ठिकठिकाणाहुन श्रद्धाळु मोठया संख्येने येथे येतात. त्रिवेणी संगमावर गंगास्नान करून भाविक विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतात.या तीर्थक्षेत्राला छोटे पंढरपूर म्हणूनही ओळखले जाते.
परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखन्याकरिता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी यांनी कलम 144 जमावबंदी आदेशानुसार वढा येथील यात्रा महोत्सव रद्द करण्याचे निर्देश दिले आहे. कुणीही दुकाने लावू नये व गर्दी करू नये असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश काढण्यात आला आहे.