💻

💻

३० नोव्हेंबर पर्यंत नविन मतदार नोंदणी करा:- तहसिलदार कनवाडे. #Pombhurna


ऑनलाईन नोंदणीही करता येणार.

२७ व २८ नोव्हेंबरला विशेष मोहीम.

पोंभूर्णा:- नविन मतदार नोंदणी, स्थलांतरांताचे व मयताचे नाव यादीतून वगळणे ही कामे ३० नोव्हेंबरपर्यंत केली जाणार आहेत.त्यानुसार १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंदणी करावे असे आवाहन तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक व युवतींनी मतदार म्हणून मतदान यादीत नोंद करून घ्यावे, लग्न होऊन आलेल्या सुनांची मतदार नोंदणी करणे,नाव नोंदणीत चुका असतील ते दुरस्ती करणे, मतदार नोंदणी वाढवणे, मतदानाची टक्केवारी वाढवणे. प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाव्दारे वोटर हेल्पलाईन ॲप विकसित करण्यात आले असून एनव्हीएसपी.आयएन (www.nvsp.in) या संकेतस्थळावरून ऑनलाईन मतदार नोंदणी नागरिकांना करता येईल.निवडणूक विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या अर्ज क्रमांक ६ च्या अर्जातून नागरिकांना मतदान नोंदणी करता येणार आहे.
पोंभूर्णा तहसील कार्यालयामार्फत २७ व २८ नोव्हेंबरला तालूक्यात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यादिवशी तालुक्यातील प्रत्येक मतदार केंद्रात मतदान पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हजर राहून मतदार नोंदणीसाठी अर्ज स्विकारणार आहेत.तर इतर दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे अर्ज स्विकारतील. नागरिकांनी आवश्यक नमुन्यात अर्ज दाखल करून नवीन मतदार नोंदणी करण्याचे आवाहन तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत