Top News

सुमठाणा फाट्याजवळ बर्निंग कारचा थरार.... #Fire

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
चंद्रपूर:- आसिफाबाद राज्य महामार्गावर सुमठाणा फाट्यानजीक संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास फोर्ड कंपनीच्या एका चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. राजुरा येथील जनपल्लीवार नामक युवक संध्याकाळी 6 च्या सुमारास आपल्या फोर्ड कंपनीच्या गाडी क्रमांक MH 02 BJ 9755 कारने विरूर स्टेशन येथे जाण्यास निघाला असता सुमठाणा टी पॉईंट पासुन जवळपास अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर त्याला कारच्या समोरच्या भागातून धूर निघत असल्याचे जाणवले.
कार मधे काहीतरी जळत असल्याची जाणीव होताच त्याने रस्त्याच्या कडेला कार उभी करून तात्काळ सोबत असलेल्या मित्रासह बाहेर पडला व कार बंद केली. आग विझविण्यासाठी कार चे बॉनेट उघडण्याचा प्रयत्न करूनही बॉनेट उघडण्यात यश आले नाही. दरम्यान कारला आग लागल्याचे कळताच काही वाहने थांबली व ही माहिती मिळाल्यामुळे राजुरा येथिल काही युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पाठीमागून येणारे पत्रकार सागर भटपल्लीवार, अमित जयपूरकर, फारुख शेख यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
ह्या आगीत कारची बॅटरी जळाली त्याचप्रमाणे इतर भाग सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असुन ह्या आगीत कारचे पन्नास हजारपेक्षा जास्त नुकसान झाले असण्याची शक्‍यता आहे. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही अप्रिय घटना घडली नाही हे विशेष.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने