चंद्रपूर:- महाराष्ट्र टग ऑफ वार असोसिएशनच्या पत्रानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सब ज्युनिअर , ज्युनिअर व सिनीयर मुले व मुली टग ऑफ वार (रस्साखेच) खेळाडुंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. २२ सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनीयर मुले व मुली टग ऑफ वार (रस्साखेच) राज्य अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन १७ ते १ ९ नोव्हेंबर २०२१ दरम्यान चिंचणी येथे गावदेवी मैदान ता. डेहाणु जि. पालघर समुद्र किनारी येथे करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचा संघ सहभाग करण्याकरिता टग ऑफ वार (रस्साखेच) चंद्रपूर जिल्ह्याची निवड चाचणी दिनांक ०७ नोव्हेंबर २०२१ रविवार ला सकाळी ठिक १०.०० वाजता राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर, तह. बल्लारपूर जिल्हा. चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.
उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या मुले व मुली खेळाडूंचे टग ऑफ वार (रस्साखेच) असोसिएशन चंद्रपूरच्या संघात निवड केली जाईल व निवड झालेला संघ चिंचणी येथे गावदेवी मैदान ता. डेहाणु जि. पालघर समुद्र किनारी येथे १७ ते १९ नोव्हेंबर २०२१ रोजी २२ महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तरी इच्छूक खेळाडूंनी चंद्रपूर जिल्हाचे सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर 8007161616 व बंडु डोहे 7066666105 यांच्याशी संपर्क साधावा.
निवड चाचणीचे नियम....
०१) U/17 वर्षासाठी ०१/०१/२००४ किंवा त्यानंतरचा जन्म असावा.
०२ ) U/19 वर्षासाठी ०१/०१/२००२ किंवा त्यानंतरचा जन्म असावा.
०३) खेळाडूने मुळ आधार कार्ड व दोन प्रतीत झेरॉक्स व ४ पासपोर्ट फोटो आणावे.
०४) U/17 व U/19 खेळाडूने जन्म तारखेचा दाखला किवा टि.सी. सोबत आणावा.