Top News

सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली भाऊबीज. #Bhaubhij


पोंभुर्णा:- भारतीय जनता पार्टी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करीत असते. सण उत्सव साजरे करून समाजात एकता आणि एकात्मता नांदावी यासाठीचा हा प्रयत्न असतो. दिवाळी, भाऊबीज निमित्ताने पोंभुर्णा भाजपा महिला आघाडीच्या वतीने मिठाई व गरजूंना कपडे वाटप करून ही भाऊबिज साजरी करण्यात आली.

याप्रसंगी सभापती तथा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनिता मॅकलवार, भाजयुमो जिल्हा सचिव मोहन चलाख, भाजपा महामंत्री ईश्वर नैताम, महेश रणदिवे, शहराध्यक्ष वैशाली बोलमवार, भाजयुमो शहराध्यक्ष विनोद कानमपल्लीवार, महेंद्र कामीडवार दिलीप मॅकलवार, भाजपा कार्यकर्ते तथा नगर पंचायतचे सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने