सास्ती ओपनकास्ट कोळसा खाणीत होलपॅक डंपरला आग. #Fire


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील सास्ती ओपनकास्ट या खुल्या खाणीत कोळसा वाहतुक करणार्‍या एका डंपरला आग लागून त्याचा इंजिन व चालकाच्या केबिन कडील भाग जळून खाक झाला. एका कामगाराला आग लागल्याचे दिसताच त्याने तातडीने चालकाला माहिती देऊन शिताफीने होलपॅक-डंपर वरुन खाली उतरविले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
विशेष म्हणजे या कोळसा खाणीत सध्या सतर्कता जागरूकता अभियान सुरू आहे. नऊ महिन्यापुर्वी या कोळसा खाणीत डंपर उलटून पेट घेतल्याने एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
दिनांक 7 नोव्हेंबरला सकाळच्या पाळीत दहा वाजताचे दरम्यान भारत कुडे हे चालक खाणीतून कोळसा भरून सतरा क्रमांकाच्या कोळसा स्टॉककडे बीएमएल कंपनीचा डंपर क्रमांक 1241 घेऊन जात होते. यावेळी अचानक ठिणगी पडून डंपरच्या इंजिनाजवळ आग लागली. मात्र 60 टनाचे मोठे डंपर असल्याने चालकाला काहीच लक्षात आले नाही.
परंतु यावेळी दुसऱ्या डंपरचे चालक व कामगार नेते मधुकर डांगे यांना लक्षात येताच त्यांनी तातडीने इतर कामगारांच्या मदतीने भारत कुडे यांना खाली उतरविले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुचना दिली. यानंतर अग्नीशमन यंत्रणेने ही आग विझवली. यामुळे प्राणहानी आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र डंपरचे मोठे नुकसान झाले. सास्ती ओपन कास्ट कोळसा खाणीत नऊ महिन्यापूर्वी अपघात होऊन डंपर उलटून चालक अक्षय खरतड यांचा मृत्यू झाला होता. मात्र यावेळी कामगारांच्या सतर्कने मोठी दुर्घटना टळली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने