छत्तीसगड:- छत्तीसगडमधील सुकमा येथून एक मोठी बातमी समोर येतेय. जिल्ह्यातील मराईगुडा येथील लिंगानापल्ली कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने सहकारी जवानांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
4 जवानांचा मृत्यू; 3 जवान जखमी.
जिल्ह्यातील मरईगुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लिगमपल्ली सीआरपीएफ 50 बटालियन कॅम्पमध्ये ही घटना घडली. मध्यरात्री 3 वाजून 25 वाजण्याच्या सुमारास जवानानं हा गोळीबार केला आहे.
नेमकं काय घडलं....
रितेश रंजन या जवानानं मध्यरात्री 3 वाजून 25 वाजण्याच्या सुमारास आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केला आहे. या घटनेत 3 जवानांचा मृत्यू तर 4 जवान जखमी झाले आहेत अशी माहिती मिळाली आहे. या जखमी जवानांवर तात्काळ भद्राचलम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.