Top News

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपा पोंभुर्णा च्या वतीने धरणे आंदोलन. #Moment


पोंभुर्णा:- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांची नुकसान भरपाई मिळालेली नाही आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचा एकही पैसा शेतकऱ्यांना मिळालेला नाही अशा अनेक मागण्या घेऊन दिनांक ०२ नोव्हेंबला छत्रपती शिवाजी चौक पोंभुर्णा येथे भाजपा तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना आजपर्यंतची थकीत कर्जमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांची मागील कर्जमाफीत अन्य अडचणींमुळे कर्जमाफी होऊ शकली नाही त्यांच्याही कर्जमाफीतील त्रुट्या दूर करुन देण्यात यावी, निराधार नागरिकांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जमा करण्यात यावे, २०२० मधील पीक विम्याची तफावत दूर करुन उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, कोरोना काळातील ग्राहक व शेतकऱ्यांच्या वीज बिलात माफी देण्यात यावी, बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी इत्यादी मागण्यांचा समावेश होता.
या धरणे आंदोलनाला भाजपा महिला आघाडी चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, शहराध्यक्ष ऋषीं कोटरंगे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अजय मस्के, ओमदेव पाल, भाजपा महामंत्री अजित मंगळगिरीवार, दिलीप मॅकलवार, तुळशीराम रोहणकर, नैलेश चिंचोलकर, माजी उपनराध्यक्षा रजियाताई कुरेशी , माजी नगरसेविका सुनिता ताई मॅकलवार , माधुरीताई मोरे, माजी नगरसेवक मोहन चलाख, बबन गोरंतवार, शामसुंदर नैताम, रवींद्र गेडाम, गजानन मडावी, नवनाथ आत्राम, अमोल पाल, नेरु मोरे तालुका अध्यक्ष ओ.बी.सी. युवक आघाडी युवा मोर्चा, संजय जवादे, वैभव पिंपळशेंडे, किरण निमगडे, अविशांत अलगमावर, बालाजी नैताम, प्रेमदास इष्टाम, राजु ठाकरे, तालुक्यातील शेतकरी, श्रावणबाळ व निराधार थकीत अनुदान धारक नागरिक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने