शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या ठाकरे सरकार विरुद्ध चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी निदर्शने. #Warora

वरोरा तहसीलदारांनी शेतकऱ्यांचे निवेदन घेण्यास नकार दिल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दालनासमोरच केले ठिय्या आंदोलन.
वरोरा:- लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपा तर्फे आज दिनांक २ नोव्हेंबर ऐन दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण जिल्हाभर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी जिल्हातील सर्व तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध आंदोलने करत निवेदन देण्यात आले .


भाजपा जिल्ह्याध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत वरोरा तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले,महाविकास आघाडी सरकारची वागणूक शेतकरी बांधवाच्या हिताची नाही, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे , वारेमाप आश्वासने सरकारने शेतकऱ्यांना देऊन ही एकही आश्वासन हे सरकार पूर्ण करण्यास सपशेल अपयशी झाले आहे , महाविकास आघाडी सरकार विरुद्ध शेतकरी बांधव नारे देत ,निषेध व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी सरकारने माफी मागावी अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.


आंदोलनानंतर तहसीलदार वरोरा यांना निवेदन देण्यासाठी देवराव भोंगळे यांचेसह भाजपचे शिष्टमंडळ गेले असता, त्यांना तहसीलदार मीटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले गेले. वास्तविक तहसीलदार हे कोळसाखाणीचे दोन कंत्राटदार यांच्या सोबत बोलत होते, बाहेर शेतकरी बांधवांचे शिष्टमंडळ असूनही
बराच वेळ झाल्याने शिष्टमंडळाने पुन्हा विचारणा केल्यावर कार्यालयाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे शिष्टमंडळाने थेट तहसीलदारांना गाठले असता, त्यांनी शेतकर्‍यांच्या रास्त न्यायासाठी आलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाचे निवेदन घेण्यास टाळाटाळ केली. त्यावरुन श्री. देवराव भोंगळे यांचेसह आलेल्या सर्व कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी थेट तहसीलदारांच्या दालनापुढेच ठिय्या मांडला. आणि निर्दयी आघाडी सरकारसह तहसिलदारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांचा रोष ओळखून शेवटी तहसीलदारांना नमते घ्यावे लागले, आणि त्यांनी निवेदन स्विकारले.
जिल्ह्यामध्ये वरोरा, भद्रावती, पोंभुर्णा, बल्लारपूर, नागभीड, चिमूर, जिवती, कोरपना, सावली , राजुरा, चंद्रपूर, गोंडपीपरी इत्यादी ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध आंदोलने झाली .
यावेळी भाजपा नेत्या वनिता कानडे, प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे,नगराध्यक्ष अहेतशाम अली,जिल्हा उपाध्यक्ष डॉ गायकवाड, शहर अध्यक्ष सुरेश महाजन,जिल्हा परिषद सदस्य ज्योती वाकडे, खुशाल सोमलकर, नगरसेवक दिलीप घोडपडे, अनिल साखरिया, करण देवतळे, सौ.सुनीता काकडे ,सौ.समर्थ ,डॉक्टर दुर्गे, विमल निंबाळकर, अंकुश आगलावे, मधुसूदन टिपले, श्री.बघेल, श्री.कोसरकर, विनोद लोहकरे, संदीप किन्नके, कीर्ती कातोरे, बाबा भागडे, अमित चवले, नगरसेविका सुनीता काकडे, अनिल साखरिया, दिलीप घोरपडे, सायरा शेख, विठ्ठल लेडे, बाळू भोयर,दादू कंगारे, राहुल बांदुरकर,अमित आसेकर , मुन्ना सुराना,प्रतीक साठे व अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत