ती खोलीत गेली अन् घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. #Suicide


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. १) सायंकाळी जाहीर झाला. निकाल बघताच अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने राजुरा येथील विद्यार्थिनीने रात्रीच गळफास घेऊन आत्महत्या केली.
कृष्णा नंदकिशोर पिल्लारे (वय १८) असे तिचे नाव आहे. सर्वत्र दिवाळीचा आनंद असताना पिल्लारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुसाईड नोटमध्ये कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केल्याचा उल्लेख तिने केला आहे.
रामनगर येथील नंदकिशोर पिल्लारे हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांना दोन मुली. मोठी मुलगी पुण्यात शिक्षण घेते, तर लाहन क्रिष्णा बारावीनंतर नीटच्या परीक्षेची तयारी करीत होती. नीट परीक्षेचा निकाल सोमवारी सायंकाळी लागला. निकाल बघून कृष्णा आपल्या खोलीत गेली. त्यावेळी मोठी बहीण तिथे होती.
पाणी पिण्यासाठी मोठी बहीण खाली उतरली. त्याचवेळी कृष्णाने गळफास लावला. घरच्यांनी दार तोडण्याचा प्रयत्न केला. तोपर्यत कृष्णाने आत्महत्या केली होती. निकाल बघितल्यानंतर असा निर्णय ती घेईल असे कुणालाही वाटले नव्हते. मृत्यूपूर्वी तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कमी गुण मिळाल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे.
नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तिने टोकाची भूमिका घेतली. तसा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे.
चंद्रशेखर बहादुरे,
पोलिस निरीक्षक, राजुरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत