सुधीर वडपल्लीवर यांची अल्पावधीतच घरवापासी. #Pombhurna.

शिवबंधन तोडून भाजपात केला प्रवेश.
पोंभुर्णा:- दि. ११ ऑगस्टला ला चंद्रपूरात घोसरी येथील युवामोर्चाचे घोसरी प्रमुख सुधीर वडपल्लीवार यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम करत शिवबंधन हाती बांधले होते.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच सुधीर वडपल्लीवर यांनी घरवापासी केली. भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे सुधीर वडपल्लीवर यांनी शिवबंधन तोडून दि. २१ नोव्हेंबरला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त जुनगाव येथे भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भाजपा पक्षाचा दुपट्टा टाकून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत