औषध घेऊन घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार. #Rapeचंद्रपूर:- कितीही जनजागृती केली तरी महिला अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. रोज म्हटलं तरी महिला आणि लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येतात. असाच एक भयंकर प्रकार चंद्रपूरमध्ये समोर आला आहे. मेडिकलमधून औषधी घेऊन निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे घडली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात घुग्घुस पोलीसांनी वणी येथील आरोपी राजेश समय्या सब्बनवर (56) याला अटक केली आहे. पोलीस सूत्रांचा माहीतीनुसार, औषध घेण्यासाठी घुग्घुस येथील अल्पवयीन मुलगी मेडीकलमध्ये गेली होती. औषध घेऊन ती निघाली असता आरोपी राजेश सब्बनवार याने तिला थांबवले. वाहनावर बसण्याचा त्याने आग्रह धरला. ती विश्वाने बसली मात्र, आरोपीने चंद्रपूर रस्त्यावरील अंतुर्ली फाट्यावर वाहन थांबवले अन् तिच्यावर अत्याचार केला.
ती विनवनी करत होती. मात्र, वासनेने आंधळा झालेल्या आरोपीनी तिच्यावर बळजबरी केली. या प्रकाराची तक्रार अल्पवयीन मुलीने घुग्घुस पोलीस स्टेशनला केली. तक्रारीवरून पोलीसांनी राजेश समय्या सब्बनवारला बुधवारी सायंकाळी अटक केली. पुढील तपास ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मेघा गोखरे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत