(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- हनी ट्रॅपच्या माध्यमातून एका वकिलाला फसवण्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात करंजी गावातील एका तरुणाल मोबाईलवर एक मुलीचा फोन आला. फोनवर संभाषण करतानाच तिने जाळे फेकले आणि यात हे तरूण महोदय अलगद अडकले. शेवटी प्रकरण पोलिसात गेले.
तरुणाच्या डोक्यावरून पाणी गेल्यावर त्यानं सामाजिक कार्यकर्त्यांची मदत मागितली. सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने तक्रार दाखल केली. समाज माध्यमांवर सक्रिय राहताना काळजी घेण्याचे पोलिसांनी आवाहन केले.
प्रलोभनाला बळी पडू नका....
शेवटी बदनामीची भीती मनातून काढत तरुणाने पोलिसात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशा प्रकारांना लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन गोंडपिंपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू यांनी केले. आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या हाती स्मार्टफोन आहे. तंत्र विकसित झाल्याने अनेक नकोशा गोष्टी सहज नजरेस पडत आहेत. अशातच या महाजाळातून मोहाच्या गोष्टी टाळण्यासाठीतरी परस्पर थेट संवादाची गरज व्यक्त केली जात आहे.