पट्टेदार वाघाने केले महिलेला ठार. #Tigerattack #tiger


पोंभूर्णा वनपरीक्षेत्रातील घटना.
पोंभूर्णा:- पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या कविठबोडी शेतशिवार सर्वे नंबर ५५ मध्ये पट्टेदार वाघाच्या हल्यात महिला ठार झाल्याची घटना आज दुपारी २:०० वाजताच्या सुमारास घडली. कसरगट्टा बिट वनक्षेत्र कक्ष क्रमांक ९२ नजीक घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की, कसरगठा येथील बेबिबाई हनुमान धोडरे वय ५५ वर्ष हि कापूस वेचण्ययाकरीता स्वत:च्या शेतात गेली असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने महिलेवर हल्ला चढवून महिलेला ठार केले. 
    घटनेची माहिती वनअधिकाऱ्यांना मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, व घटनेचा पंचनामा सुरू आहे. घटनास्थळी ए.सी.एफ. शर्मा, वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांची उपस्थिती होते.
    
    सदर महिलेच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंड असून धोडरे परीवारावर दुखःचे डोंगर कोसळले आहे.
वनविभागाच्या वतीने मृतक महिलेच्या परीवाराला तात्काळ मदत म्हणून 20 हजार रूपये रोख स्वरूपात व 4 लाख 80 हजार रुपये धनादेश देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत