चेक पोंभूर्णा येथील भाजीविक्रेत्या इसमाची आत्महत्या. #Suicide

Bhairav Diwase

पोंभूर्णा :- पोंभूर्णा नगरपंचायत हद्दीतील चेक पोंभूर्णा वार्ड नंबर-१ येथील भाजीपाला विक्रेत्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
चेक पोंभूर्णा येथील अनिल खुशाल निमगडे वय ४० वर्ष हा अनेक दिवसांपासून भाजीपाल्याचा व्यवसाय करीत होता. तो गावोगावी जाऊन भाजीपाला विकून आपला घरगाडा चालवायचा. सर्व सुरळीत चालू असताना २३ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजताच्या सुमारास मृतकाच्या घरून रडण्याचा आवाज ऐकून घरशेजारी जमा झाले.
मृतक घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. सदर घटनेचे मर्ग दाखल करण्यात आले. घटनेचा अधिक तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संतोष येनगंदेवार व पोलीस हवालदार सुरेश बोरकुटे करित आहेत.