परीक्षा फॉर्म भरण्याची मुदतवाढ द्यावी. अभाविप ची निवेदनाद्वारे मागणी.


अभाविप ने दिले गोंडवाना विद्यापीठ परीक्षा नियंत्रकांना निवेदन.
गडचिरोली:- दि. २१ नोव्हेंबरला रविवारची सुट्टी असल्याने व विद्यापीठमध्ये दि. २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या काम बंद आंदोलन मुळे बरेच विद्यार्थी दोन दिवस परीक्षा फॉर्म भरू शकले नाहीत.
आजमहाविद्यालय मध्ये परीक्षा फॉर्म भरण्यास आलेल्या विद्यार्थ्यांची गर्दी बघता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली च्या वतीने परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत वाढ करण्याबाबत व विद्यापिठ वेबसाईट ( स्टूडेंट लॉग इन) बंद असल्याने बरेच विद्यार्थी मार्कशीट डाऊनलोड करू शकत नाही आहेत. परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत वाढ करण्या बाबत परिक्षा नियंत्रक निवेदनाद्वारे अभाविप ने मागणी केली.
यावेळी जयेश ठाकरे नगर मंत्री,अभिषेक देवर प्रांत सहमंत्री धनपाल बोरघरे, यश गंडाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत