भाऊ आहे का, यवतमाळ, पांढरकवडा. #Yavatmal


ऑटो चालकाने लढवली शक्कल.
यवतमाळ:- मागील २२ दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांने आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे खाजगी वाहतूकदारांना चांदीचे दिवस आले आहेत. यातही एका ऑटो चालकाने एक अनोखी शक्कल लढवत त्याने आपल्या ऑटोवर एसटी बसवर लावतात तसाप्रकारचा 'यवतमाळ-पांढरकवडा' असे लिहिलेला फलक लावला आहे. त्यामुळे त्याच्या ऑटोचा फोटो समाज माध्यमावर चांगलाच 'व्हायरल' होत आहे.
महाराष्ट्राची 'लालपरी' एसटी बसची ओळख आहे. गोरगरीब प्रवाशांपासून ते उच्चभू प्रवाशांपर्यंत सर्वांचीच गेल्या अनेक वर्षांपासून एसटी बस सुरक्षित वाहतूक करते. मात्र, काही दिवसांपासून कर्मचार्‍यांचे आंदोलन असल्याने ही लालपरी बंद आहे. यामुळे खाजगी वाहनचालक वेगवेगळ्या शक्कल लढवून प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जिल्ह्यातील अनेक बसस्थानकांमध्येच खाजगी वाहने उभी केली जात आहेत. अशाच एका खाजगी ऑटो चालकाने ही शक्कल लढवली आहे. वाहनाच्या दर्शनीभागाला एसटी बसला असतो तसा यवतमाळ-पांढरकवडा मार्गे जोडमोहा, मेटीखेडा, उमरी असा फलक लावून प्रवाशांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, त्याची ही शक्कल अनेकांच्या नजरेत भरली असून, प्रवासीसुद्धा या ऑटोच्या प्रवासाचा आनंद घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत