Top News

ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार; माजी सरपंच व सचिवांनी लावला निधीला चुना. #Mul


मुल:- मुल पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नांदगाव येथे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार विद्यमान सरपंच हिमानी दशरथ वाकुडकर यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली असून, या गंभीर घटनेची तक्रार खुद्द संवर्ग विकास अधिकारी मुल यांनी दिली असून एफआयआर दाखल झाला आहे.
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पोलीस स्टेशन मुल येथे दिलेल्या तक्रारीत सरपंच हिमानी दशरथ वाकुडकर यांनी म्हटले आहे की, तत्कालीन ग्रामसेवक उत्तम बावनथळे आणि सरपंच मंगेश मगनुरवार या दोघांनी मिळून स्वच्छ भारत मिशन व जनसुविधा योजनेचा चालू कार्यालयीन रेकॉर्ड, ज्यामध्ये कॅशबुक, चेक बुक, ठराव बुक, टेंडर फाइल्स, बँक पासबुक, पत्र व इतर कागदपत्रे काम न करता गैरव्यवहार करून निधीचा अपहार केला असल्याने फेब्रुवारी २०२१ पासून गहाळ केलेला आहे.
विद्यमान सरपंच हिमानी वाकुडकर यांनी संवर्ग विकास अधिकारी यांचेकडे पत्रव्यवहार करून सुद्धा ग्रामपंचायतीचा रेकार्ड देण्यास हेतुपुरस्कर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीतून केलेला आहे.
तत्कालीन सरपंच मंगेश मगनुरवार व सचिव उत्तम बावनथडे यांनी संगनमताने जनसुविधा योजनेचे २२ लाख रुपये व स्वच्छ भारत मिशनचे असे एकूण ३७ लाख ३६ हजाराचा अपहार केलेला आहे. या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विद्यमान सरपंच हिमानी दशरथ वाकुडकर यांनी पालक मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली शेठी, संवर्ग विकास अधिकारी यांचेकडे दाखल केलेल्या तक्रारीतून मागणी केलेली आहे. दरम्यान पोलिसांची चौकशी सुरू असून सरपंच हे भूमिगत झालेले असल्याने चौकशीत अडथळा निर्माण होत असल्याची नागरिकांमध्ये भावना व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने