Top News

तेरवीचा कार्यक्रम भोवला; अपघातात मायलेकीसह वडीलांचा मृत्यू #accident

चिमूर:- तेरवीच्या कार्यक्रमासाठी जाणारे वाहन पिंपळनेरी-खापरी मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून उलटले. यात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला, तर वडिलांचा चंद्रपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही घटना रविवारी (ता. ५) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. सायत्रा मोतीराम मेश्राम (वय ६५, रा. खापरी), कमल चुनारकर (वय ४५, रा. चंद्रपूर) व मोतीराम मेश्राम (वय ७०, रा. खापरी) अशी मृतांची नावे आहेत. या अपघात अन्य दोघे गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.
तालुक्यातील चिमूर-भिसी-उमरेड मार्गावरील खापरी धर्मू येथील मेश्राम आणि चुनारकर कुटुंबीय चारचाकी वाहनाने सरडपार येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. वाहनात सायत्रा मेश्राम, कमल चुनारकर, मोतीराम मेश्राम, उत्तम चुनारकर व अंकित राजू मेश्राम बसले होते. वाहन अक्षय चुनारकर चालवीत होता.
पिंपळनेरी-खापरी मार्गावरील उमरी फाट्यावर अक्षयचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन उलटले. यात सायत्रा मोतीराम मेश्राम आणि कमल चुनारकर या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. वडील मोतीराम मेश्राम गंभीर जखमी झाले होते. त्यांना चंद्रपूर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघात उत्तम चुनारकर (वय ४५, रा. चंद्रपूर) व अंकित राजू मेश्राम (वय १०, रा. खापरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना चंद्रपुरात रेफर करण्यात आले. अक्षय चुनारकर याला किरकोळ मार लागला. पुढील तपास चिमूर पोलिस तपास ठाणेदार मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय केशव गेडाम करीत आहे. या घटनेने खापरी गावात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने