Top News

प्रधानमंत्री "रामबाण सुरक्षा योजना" फेक लिंक #PIBFactCheck

सोशल मीडियावरून मेसेज आला तर सावधान.

मला ४००० मिळाले, रजिस्ट्रेशन करा' मेसेज व्हायरल
सोशल मीडियावर एक लिंक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या लिंक मध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कोरोना विषाणूच्या उपचारासाठी सरकार प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजनेंतर्गत तरुणांना 4000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे. आता हा दावा खरा की खोटा याबाबत सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. पीआय फॅक्ट चेकने हा दावा खोटा ठरवला आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाही.

काय दावा केला जात आहे...

व्हायरल होणाऱ्या लिंक असा दावा करण्यात आला आहे की, प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजनेंतर्गत सर्व तरुणांना कोरोनाच्या मोफत उपचारासाठी 4000 रुपयांची मदत मिळणार आहे. नोंदणी करण्यासाठी आणि तुमचा फॉर्म भरण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. मला 4000 रुपये मिळाले आहेत.  तुम्ही दिलेल्या लिंकवरूनही अर्ज मिळवू शकता.


 पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check)  काय म्हटले?
 
  सरकारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने हा मेसेज फॅक्ट चेक केला आहे.  केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना (प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना) चालवली जात नसल्याचे तथ्य तपासणीत सांगण्यात आले.  अशा बनावट वेबसाइटवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने