💻

💻

तांबा तारचे रोल चोरी करणारी चंद्रपूरची टोळी जेरबंद #arrested

चंद्रपूर:- जाम येथील पी. व्ही. टेक्सटाईल कंपनीतून तांबा तारचे रोल चोरी करणार्‍या चंद्रपूरच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून 14 लाख 56 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी 5 रोजी रात्रीच्या सुमारास पी. व्ही टेक्सटाईल कंपनीच्या आवारात प्रवेश करून इलेक्ट्रिकच्या उपयोगात येणार्‍या 15 लाख 14 हजार 734 रुपये किंमतीचे कॉपर केबलचे पाच रोल चोरून नेले होते.
यासंबंधी समुद्रपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व समुद्रपूर पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नौशाद कुरेशी रा. घुग्घूस व प्रतीक उर्फ लाला शिंदे रा. चंद्रपूर यांच्या टोळीने चोरी केल्याबाबतची विश्‍वसनीय माहिती मिळाली. पथकाने दोन दिवस चंद्रपुरात तळ ठोकून आरोपींची माहिती गोळा केली आणि सापळा रचून त्यांना लखामापूर मंदिर, चंद्रपूर परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून 14 लाख 56 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणारा व चोरीचा माल विकत घेणार्‍या एकुण 9 व्यक्तींना अटक केली असून यात प्रतीक उर्फ लाला शिंदे (25), गुड्डू निषाद (21), पवन निषाद (29), विकास ढोके (21), भारत निषाद (21), छोटेलाल निषाद (25), राकेश शर्मा (36), अशोक परचाके (19), मोहम्मद इजाज अब्दुल रहमान (55) सर्व रा. चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहे. तर नौशाद कुरेश कौसर, कमलेश यादव, सलमान, बबलू निषाद, अनिल निषाद हे फरार आहे.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक गोपाल ढोले, पोलिस कर्मचारी निरंजन वरभे, गजानन लामसे, रणजित काकडे, हमीद शेख, यशवंत गोल्हर, चंदू बुरंगे, राजू तिवसकर, श्रीकांत खडसे, गोपाल बावनकर, अभिजित वाघमारे, राजू जयसिंगपूरे, समुद्रपूरचे अरविंद येनूरकर, निलेश पेटकर, रवी पुरोहित, वैभव चरडे, सायबर सेलचे दिनेश बोथकर, अनुप कावळे, यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत