Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

कामगार नेते हजारेंनी घेतली कामगार मंत्री कडु यांची भेट

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा हा औद्योगीक जिल्हा असून  जिल्हात कामगारांच्या विविध समस्या आहे. त्या सर्व समस्या घेवुन चंद्रपूर मनपा चे माजी नगरसेवक तथा कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हा प्रमुख बंडू हजारे यांनी आज १ डिसेंबर रोज बुधवारला नागपुर येथील सिंचन भवन नागपुर येथे  प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक तथा कामगार राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांची भेट घेत  कामगारांच्या   व्यथा त्यांच्या समोर मांडल्या. यावेळी नामदार कडू यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बैठक लावण्याचे आश्वासन दिले. या वेळी संघटनेचे जिल्हा सचिव तथा चंद्रपूर विधानसभा शेत्राचे युवा सेना समन्वयक अमोल मेश्राम तसेच  कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कामगारांच्या विविध समस्या आहेत त्यात प्रामुख्याने स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न असून जिल्ह्यात परराज्यातील कामगारांचा भरणा सुरू आहे त्याच सोबत जिल्हयातील कंत्राटी कामगारांवर कंत्रादारांकडून अन्याय केला जात आहे. या बाबत बंडू हजारे यांच्या माध्यमातून लवकरच मोठे आंदोलन  उभे राहणार आहे तत्पूर्वी त्यांनी नामदार कडू यांची भेट घेतली तसेच नामदार कडू हे लवकरच जिल्हा दौरा करणार असल्याचे ही ते या वेळी बोलले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत