💻

💻

सिंदेवाही येथे शिवसेनेत पडले खिंडार

आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश
सिंदेवाही:- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही येथील शिवसेनेचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या वर विश्वास ठेवून भाजपा मध्ये प्रवेश केल्याने सिंदेवाही येथे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. 
सिंदेवाही येथील कार्यक्रमात आ. बंटीभाऊ भांगडीया, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, सिंदेवाही भाजपा तालुका अध्यक्ष राजु पाटील बोरकर, चिमूर भाजपा तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना सोडून भाजप मध्ये प्रवेश केल्याने भाजपाला बळकटी मिळाली आहे.
शिवसेनेचे ब्रम्हपुरी विधानसभा प्रमुख तथा युवा सेना उपजिल्हा प्रमुख आशिष चिंतलवार, शिवसेना तालुका प्रमुख देवा मंडलवार, तालुका संघटक रवी सगडाम महेश गेडाम, सागर बोरकर, प्रीतम नागोसे, उज्वला सिडाम, किशोर कोठेवार, दुर्वास मंडलवार, सुमित कटकमवार किशोर बोरकर, प्रतीक वैकुंठी, रुपेश गागरेड्डीवार, श्याम गडाईत, विभा कामडी, प्रेमीला निकोडे, अल्का बोरकर, प्रकाश गेडाम, रवींद्र बोरकर राकेश मारशेट्टीवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपामध्ये जाहीरपणे प्रवेश केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत