Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

आशा महिला ग्रामसंघाच्या वतीने आठवडी बाजाराचे उदघाटन सोहळा संपन्न #sindewahi

उमेद अभियानाचे ग्रामीण भागातील महिला बचत गटाचे विकासाकडे वाटचाल
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत आशा महिला ग्रामसंघ डोंगरगावं सलोड तालुका सिंदेवाही च्या वतीने आठवडी बाजार (रुलर हॅट) भरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उदघाटक मंदाताई बाळबुद्धे पंचायत समिती सभापती, कार्यक्रमाचे अध्यक्ष माधुरीताई सुरपाम सरपंच ग्रामपंचायत डोंगरगावं , प्रमुख अतिथी मधुकरजी मडावी पंचायत समिती सदस्य, रितेसभाऊ अलमस्त पंचायत समिती सदस्य , सीमाताई गणवीर प्रभागसंघ अध्यक्ष,घोटोळे सहाय्यक गटविकास अधिकारी प.स.सिंदेवाही , कांबळे सर कृषी विस्तार अधिकारी प.स.सिंदेवाही, कार्यक्रमाचे प्रस्ताविक विवेक नागरे तालुका अभियान व्यवस्थापक (उमेद) यांनी केले. उद्धव मडावी तालुका व्यवस्थापक (उमेद) ज्ञानेश्वर मलेवार प्रभाग समन्वयक, सविता उईके प्रभाग समन्वयक,आशा महिला ग्रामसंघाचे अध्यक्ष , कविता अगडे ,ग्राम पंचायत पदाधिकारी , पोलीस पाटील व प्रभागातील ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते.कार्यक्रम येसस्वितेकरिता अर्चना पाकमोडे, रीना वल्के,मीना आलम, विनिता बोरकर,दर्शना बोरकर ,मयुर खोब्रागडे, सचिन लोध्ये,प्रभाकर मानकर यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत