विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, केशव उपाध्येचा आरोप #rajura #chandrapur

Bhairav Diwase
केशव उपाध्ये यांनी अंध भक्तांसारखे बघू नये; "त्या" आरोपानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

मुंबई:- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी चंद्रपूर येथील राजुरा नगर परिषद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. मात्र पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना त्यांनी पुतळ्याच्या भागावरच पाय दिला. यावरूनच भाजप नेते केशव उपाध्ये यांनी विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याचे म्हटले आहे. यावरूनच राजकारण रंगले आहे.

केशव उपाध्ये यांनी काय आरोप केले?

भाजप नेते केशव उपाध्ये यांनी वडेट्टीवार यांचा पुतळ्यावर पाय देतानाचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट करत टीका केली आहे. महाआघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याच्या भागावरच पाय ठेवला. यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय ॲक्शन घेणार,वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार? असा प्रश्न केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्वीट करत केला.

"त्या" आरोपानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

असताना वडेट्टीवार यांना प्रतिक्रिया देत उपाध्ये यांना खुले आव्हान दिले आहे. ‘हा पूर्णतः खोडसळपणा आहे. केशव उपाध्ये यांनी डोळे उघडून बघावे. त्यांनी आंधळ्या भक्तांसारखे बघू नये. मी हार घालताना महाराजांच्या शेजारी माझा पाय आहे. पायावर पाय नाही. त्यामुळे अंध भक्त म्हणू नका. मी आव्हान करतो की, तो व्हिडिओ परत दाखवावा. माझ्याकडे तो व्हिडिओ घेऊन यावा. माझ्याकडे ती संपूर्ण क्लिप आहे. जर व्हिडिओ बारकाईने बघितला तर दिसेल की, पायाच्या शेजारी मी पाय ठेवला आहे. माझी हाईट कमी असल्याने मी पुतळ्याच्या शेजारी उभा राहिलो.मात्र भाजपला मुद्दामहून खोडसाळपणा करण्याची सवय आहे. काही विद्रूप लोक मुद्दामहून माझे नाव बदनाम करण्याचे कृत्य करत असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. जर केशव उपाध्ये यांच्यात दम असेल तर माझ्याकडे व्हिडिओ घेऊन यावे आणि सिद्ध करून दाखवावे. असे आव्हान विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. ज्यांनी कधी त्यांच्या मातृसंघामध्ये ५० वर्षांमध्ये शिवाजी महाराजांचा फोटो लावला नाही, अशांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करणे शिकवू नये. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.