💻

💻

यंग चांदा ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्ता भ्रष्टाराविरोधात सैनिक म्हणून लढेल:- आ. किशोर जोरगेवार #Chandrapur

मनपा समोर यंग चांदा ब्रिगेडचे मनपातील सत्ताधारी भ्रष्टाचाऱ्यांना 5 स्टार पुरस्कार वितरण आंदोलन
चंद्रपूर:- 25 वर्षापासून पालिकेत भाजप सत्ता उपभोगत आहे. सत्ताधाऱ्यांना या 25 वर्षात साध पिण्याच पाणीसूध्दा चंद्रपूरकरांना नियमीत देता आले नाही. यातून त्यांची कार्यक्षमता लक्षात येते. आता अमृत कलश योजनेचा महाघोटाळा करत शहरातील सर्व रस्ते खोदून चंद्रपूर शहराला विद्रूप करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. महामारीच्या काळातही गरजुंच्या जेवणाच्या डब्यात घोटाळा करत मनपातील सत्ताधाऱ्यांनी घोटाळेबाजीत विक्रम नोंदविला आहे. मात्र आता या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असून यंग चांदा ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्ता भ्रष्टाचारा विरोधात सैनिक म्हणून लढेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
मनपातील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्यांसाठी त्यांना 5 स्टार देण्याचे अभिनव आंदोलन आज गुरुवारी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा समोर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सर्व प्रथम देशाचे संरक्षण दल प्रमूख जनरल बिपीन रावत यांच्यासह सर्व शहिद जवांनाना दोन मिनिटांचा मौण पाडून श्रद्धांजली देण्यात आली. त्यानंतर आंदोलनाला सुरवात झाली. यावेळी प्रसंगी प्रतिकात्मक महापौर व उपमहापौर यांना 5 स्टार नामांकन देऊन गौरविण्यात आले. या आंदोलनाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, यंग चांदा ब्रिगेडचे संघटक कलाकार मल्लारप, पंकज गुप्ता, श्याम हेडावु, सलिम शेख, राम जंगम, तिरुपती कलगुरुवार, अजय दुर्गे, करणसिंह बैस, तापूष डे, नितीन शहा, आनंद इंगळे, आनंद रनशूर, बबलू मेश्राम, हरमन जोसेफ, विलास वनकर, विलास सोमलवार, प्रतिक शिवणकर, रुपेश पांडे, प्रशांत रोहनकर, इमरान खान, प्रेम गंगाधरे, सय्यद अबरार, नकुल वासमवार, कालिदास धामणगे, देवा कुंटा, दुर्गा वैरागेडे, कल्पना शिंदे, विमल काटकर, भाग्यश्री हांडे, वैशाली मेश्राम, सविता दंडारे, आशा देशमूख, अस्मिता दोनारकर, संगीता विश्वोजवार, नायदा काजी, अनिता झाडे, शमा काजी, शांता धांडे, वैशाली रत्नपारखी, वंदना वाघमारे, आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, महानगर पालिकेतील सफाई कर्मचारी अपू-या वेतन व सुरक्षा साधनांच्या अभावत उत्तम सेवा देत आहे. त्यांच्या याच सेवेमूळे चंद्रपूर मनपाने स्वच्छ सर्वेक्षणात तिन स्टार नामांकन मिळवीले मात्र याचे सर्व श्रेय मनपातील भ्रष्टाचारी सत्ताधिकारी घेत असून शहरात होर्डींग्स लावून गवगवा करत आहे. मात्र त्यांच्या या खोट्या गवगव्याने त्यांनी केलेला कोट्यावधी रुपयांचा घोटाळा लपणार नाही. त्यांनी जनतेच्या कराच्या पैशाची लुट केली आहे. असा आरोपही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केला. नागरिकांच्या करातून येणा-या पैश्याचे नियोजन मनपातील सत्ताधाऱ्यांना करता आले नाही. परिणामी चंद्रपूर शहरातील नागरिकांना आजही मुलभुत सोयी सुविधांसाठी लढावे लागत आहे. पाणी कर अदा करुनही शहरातील अनेक भागात नियमीत पाणी पूरवठा केला जात नाही. मनपातील भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांच्या या भोंगळ कारभाराला जनता कंटाळली आहे. आता त्यांना परिवर्तन हव असेही यावेळी ते बोलले. जटपूरा गेटच्या वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आपण वेळो-वेळी मनपा प्रशासनाला योग्य सुचना केल्यात मात्र नियोजन शुन्य कारभारामूळे हा प्रश्नही मनपा प्रशासनाने सोडविला नाही. हुकूमशाहीचे निर्णय घेत मनपाने चंद्रपूरकरांवर वारंवार अन्याय केला आहे. त्यांच्या याच धोरणांमूळे अनेक योजनांपासून चंद्रपूरकरांना वंचित राहावे लागत असल्याचा आरोपही यावेळी बोलतांना त्यांनी केला.
मनपातील भ्रष्टाचाऱ्यांनी मागील चार वर्षात अमृत कलश योजना घोटाळा, घनकचरा घोटाळा, कोविड घोटाळा, आझाद बाग घोटाळा, लेखापरिक्षणात कोट्यावधी रुपयांची अनियमितता यांसह अनेक घोटाळे करत राज्यातील सर्वाधिक भ्रष्ट महानगरपालिका म्हणून स्व:ताची ओळख निर्माण केली आहे. आता या भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकविण्याचा संकल्प चंद्रपूरकरांनी केला असून हे आंदोलन याची सुरवात असल्याचेही ते यावेळी म्हणाले, दुपारी 2 वाजता यंग चांदा बिग्रेडच्या कार्यालयातून या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी मनपा विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनकर्ते महानगरपालिकेवर धडकले. येथे या आंदोलनाचे रुपांत्तर 5 स्टार पूरस्कार वितरण सोहळ्यात झाले. यावेळी प्रतिकात्मक महापौर आणि उपमहापौर यांना 5 स्टार नामांकन देत शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या आंदोलनाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत