श्री बालाजी ब्रम्होत्सव सोहळ्यास ग्राम सफाई व रक्तदान शिबिराने झाली सुरुवात #rajura

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा 
राजुरा:- श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा (मा) ता. राजुरा येथे दरवर्षी प्रमाणे ब्रम्होत्सव सोहळ्याचे आयोजन केले जात आहे पहिल्या दिवशी जि. प. उच्च माध्य. शाळा चुनाळा, जि. प तेलगू माध्यम शाळा, शिवाजी हायस्कूल चुनाळा व ग्रामस्थांनच्या वतीने ग्रामसफाई करून जनजागृती दिंडी काढण्यात आली व त्यानंतर रक्तदान शिबिर संपन्न झाले रक्तदानात युवकांनी सहभाग घेतला.
🟥
या ब्रम्होत्सव कार्यक्रमातील विवीध धार्मिक विधी श्री शास्त्रपुर्ण पराशराम विखनासाचार्युलू सुपुत्र पत्ताभिरामाचार्युलू महाराज विजयवाडा (आ. प्र) शिष्यांसह उपस्थित राहून वैखानशा आगमशातस्त्रानुसार संपन्न करणार असून भक्तजनानी या शुभ कार्यास तन मन धनाने सहभागी होऊन ईश्वर सेवा तथा ईश्वरपूर्ती प्राप्त करावी असे ब्रम्होत्सव उत्सव समिती चुनाळा यांनी आव्हाहन केले
🟥
या कार्यक्रमाला उपस्थित सुदर्शन निमकर (माजी आमदार राजुरा), प्रकाश कोठारी (उपाध्यक्ष) वाय. राधाकृष्ण (सचिव)
बाळनाथ वडस्कर (सरपंच ग्राम पंचायत चुनाळा) दिलीप मामा मैसने (अध्यक्ष तंटा मुक्ती समिती) स्वप्नील शहा, ओबलेसु गवेनी,पंडित रामायण मिश्रा, अमन करमनकर, राजु निमकर,संदेश दुर्गे, विजय कार्लेकर, अक्षय वडस्कर, दशरथ कार्लेकर,संदीप मासिरकर, मुन्ना निमकर, राजु लिंगे चिरंजीवी संगी,साईनाथ मोरे ,नरेंद्र निखाडे, नितेश गौरकर, नरेंद्र पामुलवार, पंढरी निखाडे,प्रदीप राजूरकर, प्रभाकर साळवे
🟥
श्री तिरुपती बालाजी देवस्थान, चुनाळा(मा)
सोळावा ब्रम्होत्सव सोळावा

कार्यक्रमाची रूपरेषा

९ डिसेंबर २०२१ ते १२ डिसेंबर २०२१
••• कार्यक्रम •••

गुरुवार दि.९ डिसेंबर २०२१
सकाळी ८ वाजता : ग्रामसफाई जनजागृती दिंडी
(सहभाग ग्रामस्थ तथा श्री सांप्रदाय सेवा समिती चुनाळा, शिवाजी हायस्कूल विद्यालय तथा जि. प मराठी व तेलगू शाळा सर्व महिला मंडळ चुनाळा) 
सकाळी १०वाजता : रक्तदान तथा रक्तगट तपासणी शिबीर 
रात्रौ८ वाजता : विश्वकसेन, पूजा, पुण्याहवाहन , अंकुरारोपण,ध्वजारोहण,नवग्रहपुजा, आरती व प्रसाद 
रात्रौ ८:३० वाजता : दत्तगुरु पदावली भजन मंडळ, चुनाळा यांचा भजनाचा कार्यक्रम

 शुक्रवार दि.१० डिसेंबर २०२१
सकाळी ७ ते १०वाजेपर्यंत : भगवान बालाजी पंचामृत अभिषेक, अग्नी प्रतिष्ठा आरती व पूजा
सायं. ५ ते ७ वाजेपर्यंत : वधुवर निर्णयम (साक्षगंध) आरती व प्रसाद
रात्रौ ७ वाजता : चुनाळा येथील विवीध शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम 

शनिवार दि. ११ डिसेंबर २०२१ 
सकाळी ८ ते ११मंगलवाद्य, विश्वकसेन पूजा, पुण्याहवाचन नवग्रह पूजा हवन 
सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत : श्रीनिवास कल्याणम (श्री बालाजी विवाह सोहळा)(स्व. गुरुप्पा दासरी स्मृती प्रित्यर्थ श्री ओबय्या दासरी राजुरा यांचे कडून ब्राम्होत्सव लडू प्रसाद वितरण)
 दुपारी २:०० वाजता : श्री तिरुपती बालाजी देवस्थानाला विशेष योगदान देणाऱ्या या वर्षातील  देणगी दात्यांचा सत्कार समारंभ
दुपारी २:३० वाजता : भगवान बालाजी, श्री लक्ष्मीदेवी, श्री भुदेवी च्या उत्सवमूर्तीची १०८ कलशासह व विवीध भजन मंडळासह भव्य शोभयात्रा 
सायं ६ ते ७ वाजता : लक्ष्मीनारायण हवन अर्चना आरती व महाप्रसाद (श्री सुनिल बाबुराव उरकुडे सभापती, कृषी व पशुसंवर्धन जि. प.चंद्रपूर यांचे कडून )
रात्रौ ८ वाजता : भजनाचा कार्यक्रम 

रविवार दि.१२ डिसेंबर २०२१
सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत : मंगलवाद्य, विश्वकसेन पूजा पुण्याहवाचन अवभृघोत्सनम चक्रस्नानम, पूर्णाहुती व आरती 
सकाळी १० वाजता :  मेडिकल कॉलेज सेवाग्रम यांच्या सहकार्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचा उद्घाटन सोहळा तथा चुनाळा येथील प्रावीण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ 
सकाळी ११ वाजता : राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. लक्षणदास काळे महाराज रा. मोर्शी जि. अमरावती यांचे गोपालकाल्याचे कीर्तन
दुपारी २:३० वाजता : चुनाळा येथील सन २०१९ व २०२० मध्ये  सासरी गेलेल्या सर्व मुलींचा जावयांसह सत्कार समारंभ 
दुपारी ३ ते सायं.७ वाजेपर्यंत : महाप्रसाद 
सायं ७ ते ९ वाजेपर्यंत : द्वादशा प्रदक्षिणा, शैयन आरती, क्षिरत्रा प्रसाद