नंदप्पा ते आनंदगुडा, संगणापूर रस्त्याचें काम त्वरित चालु करा अन्यथा आंदोलन करू #Jivati

Bhairav Diwase
आपचे जिवती ता. सचिव गोविंद गोरे यांचा इशारा
जिवती:- जिवती तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चालणारा नंदप्पा ते आनंदगुडा, सगणापूर रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून कासव गतीने चालु असून रस्त्याचे काम त्वरित चालू करा.अन्यथा आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा आम आदमी पार्टी चे जिवती तालुका सचिव मा.गोविंद गोरे यांनी दिला आहे.
गेल्या सहा ते आठ महिन्यापूर्वी रस्त्यावर पूर्णपणे गिट्टी उगडी पडल्याने लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यावर गिट्टी आतरून वेवस्थित पणे पाणी न टाकता डिझेल ची विक्री करत ओबडथोबड दबई फिरवील्याने पावसाळ्यातील सतत च्या पाऊसाने संपूर्ण पाच किलोमीटर पर्यत रस्त्याची गिट्टी उगडी पडल्याचें भयावह चित्र पाहायला दिसत आहे.आता तर काम गेल्या सहा ते आठ महिन्यापासून रस्त्याचे काम पूर्णपणेच बंद असल्याने हा रस्ता होणार कां नाही ?अस्या चर्चा गाववासीय करत आहेत.
झालीगुडा,आनंदगुडा, भोक्सापूर, सगणापूर,भीमगुडा सायलूगुडा,गोंदापूर या गावांवासियांना आपल्या मोटारसायकल सुद्धा चालवणे अश्यक्य झाले आहे.जर रस्त्यावर आपघात होऊन एकदा व्यक्ती पडला दुरदैवाने त्याची काही जीवित हानी झाली तर याला जबाबदर कोण ? असा थेट सवाल आम आदमी पार्टी चे तालुका सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.गोविंद गोरे यांनी विचारला आहे.
जर रस्त्यावर पडून कोणाची जीवित हानी झालीच तर याला संपूर्ण जबादार संबंधित रस्त्याचे कंत्राटदार तसेच मुनीम जी असतील असा थेट सवाल ही श्री. मा.गोविंद गोरे यांनी केला आहे. रस्त्याचे काम त्वरित चालु करा अन्यथा आम्ही आंदोलंनाच्या स्वरूपात रस्त्यावर उतरू असी चेतावणी श्री. गोरे यांनी दिली आहे.जेथे आम माणसाची विचार करणारी आम आदमी पार्टी तिथे कदापि भरष्ट्राचार व तिरंगायची कामे चालनार नसल्याचे ही ते पुढे म्हणाले,रस्त्याच्या दुरावस्थेबदल मुनीम जी व कंत्राटदार यांना वारंवार कळवून ही ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असे गाववाशीयचे म्हणने आहे.