💻

💻

बर्थडे पार्टीला गेलेल्या 22 वर्षीय तरुणीवर 19 वर्षांच्या तरुणाने केला बलात्कार #Rape #Rapecase

पुणे:- पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली असल्याचं दिसून येत आहे. त्यातही बलात्काराच्या वाढत्या घटना या पुणेकरांच्या चिंतेत अधिक भर घालत आहेत. नुकतंच पुण्यात बर्थडे पार्टीला गेलेल्या एका 22 वर्षाच्या तरुणीवर 19 वर्षाच्या तरुणाने बलात्कार केल्याची अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे.
नेमकी घटना काय?

पुण्यातील तळजाई टेकडीवर बर्थडे पार्टीसाठी गेलेल्या तरुणीवर तेथील जंगलात बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शुभम सीताराम शिंदे (वय 19 वर्ष, रा. धनकवडी) असे आरोपीचे नाव असून त्याला अटकही करण्यात आली आहे.
सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक एस. देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पीडित तरुणीला आरोपी शुभम याने वाढदिवसाची पार्टी आहे. त्यामुळे तू पार्टीला यायला हवी असं सांगितलं. तसंच यावेळी त्याने तिला असंही सांगितलं की, 'तू तळजाई शेवटचा बस स्टॉप येथे ये.'
जेव्हा तरुणी तिथे पोहचली त्यावेळी आरोपी शुभम याच्यासोबत त्याचा एक मित्र देखील होता. त्या ठिकाणी आरोपी आणि त्याचा मित्र हे दारू पीत बसले होते. त्यावेळी 22 वर्षीय पीडित तरुणी बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन बसली.
या भागात थंडी अधिक असल्याने तरुणी तिथेच झोपी गेली होती. त्यानंतर आरोपी शुभम हा तिला जवळच असलेल्या जंगलात घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, याप्रकरणी पीडीत तरुणीने तात्काळ पोलिसात धाव घेतली. तरुणीने, सहकार पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दिली. असं वरिष्ठ निरीक्षक एस. देसाई यांनी सांगितले.
याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शुभम शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आल्याचे वरीष्ठ निरीक्षक एस. देसाई यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत