जाहिरात... Advertisement... विज्ञापन

कुष्ठांतेय सक्षमीकरण दिन समारंभ संपन्न #Nagbhid


नागभीड:- सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या वतीने ५ डिसेंबर रोजी कुष्ठांतेय सक्षमीकरण दिन समारंभ अवॉर्ड सभागृह नागभिड येथे हर्ष उल्हासाने साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून 125 कुष्ठांतेय बांधव भगिनी व त्यांचे सहकारी यांची उपस्थिती होती. 🎂
या अनोख्या व नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष उमाकांत शेंडे, उपाध्यक्ष तुकारामजी गेडाम, सचिव चंद्रशेखर कन्नाके कोषाध्यक्ष मिलिंद बारशिंगे, कार्यकारी सदस्य महादेव चौधरी आणि विशेष सल्लागार तथा मार्गदर्शक आशुतोष प्रभावळकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व करून व दीप प्रज्वलनाने झाली. कुष्ठांतेय बांधवांचे वतीने स्वागत गीत व शब्दसुमनाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
🎂
पाहुण्यांच्या हस्ते केक कापून व सर्वांना पेढे, लाडू खाऊ घालून समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी अभिप्राय व्यक्त करताना आशुतोष प्रभावळकर यांनी अलर्ट इंडिया मुंबई व सहयोगी संस्थां अवार्ड सोबत सन 2006 पासून कुष्ठरोग निर्मूलनाचे कार्य करताना कुष्ठरुग्णांनी एकत्रित यावे आणि संघटन बांधणी करून संस्था स्थापन करावी तथा कुष्टारुग्णांचे सक्षमीकरणासाठी कार्य करावे अशी इच्छा होती व संकल्प होता मात्र याकरिता चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांनी भरपूर सहकार्य केले त्यामुळेच संकल्पपूर्ती होऊन सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था उभी होऊ शकली याचा अत्यंत आनंद व सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
🎂
यावेळी मिलिंद बाराशिंगे यांनी संस्थेच्या वतीने समुदायातील कुष्ठांतेय सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम, कार्यक्रम आणि मोहीम सुरु असून समुदायाने संस्थेला व संस्थेच्या सभासदांना सहकार्य करून योगदान द्यावे असे आवाहन केले. यावेळी संस्थेच्या आर्थिक सहकार्याने  स्वतःचा व्यवसाय सुरु करून स्वावलंबी व आत्मनिर्भर होण्याचे प्रयत्न करणारे 28 उद्यमी कुष्ठातेयांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच समुदायातील सक्षमीकरणासाठी कार्यरत स्वयंसेवकांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 
 🎂
याप्रसंगी पुढे येऊन बरेच कुष्ठांतेय बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 या प्रसंगी संस्थेचे मानद् कार्यकारी संचालक गुणवंत वैद्य यानी संस्थेचा भविष्यातील कार्यक्रम व प्रकल्पांबाबत उपस्थितांना अवगत केले.
🎂
 या कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे कार्यकर्ते श्रावण हांडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंद बारसिंगे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी  अभिजीत कांबळे, संदीप माटे, शरद निकुरे आणि संपूर्ण समाज प्रवर्तक यांनी अथक परिश्रम घेतले.
🎂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत