जाहिरात... Advertisement... विज्ञापन

गडचांदूरातील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात; न.प.चे मात्र दुर्लक्ष? #Korpana

मोठ्या व्यापाऱ्यांनी आणले नालीवर दुकान
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर गडचांदूर येथील लहानमोठे रस्ते अक्षरशः अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.शहरातील विविध रस्त्यांवर सध्या नालीचे बांधकाम सुरू आहे.काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या दुकानदारांनी दुकानांपुढे विक्रीच्या वस्तू ठेवून अतिक्रमण केल्यामुळे रूंदी कमी होऊन रस्ते संकुचित झाल्याचे चित्र आहे.हे सगळे कमी होते की काय!यावर आता सैराट झालेले दुचाकीस्वार व सैरावैरा उभ्या दुचाकींनी भर टाकले आहे.यासर्व समस्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून सुखरूप चालने जिकरीचे होत आहे.यात विशेषतः महिला, लहानसहान मुले व वयोवृद्धांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अतिक्रमणामुळे रस्ते अक्षरशः अरुंद होऊन संकुचित झाले आहे.एकीकडे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाच दुसरीकडे स्थानिक नगरपरिषदेने याकडे कमालीची डोळे झाक केल्याचे आरोप होत आहे.
जिवती, कोरपना तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या गडचांदूर शहरात मोठी बाजारपेठ,शाळा,महाविद्यालय,विविध शासकिय-निमशासकिय कार्यालय असल्याने आजुबाजुच्या गावखेड्यातून दररोज मोठ्यासंख्यने नागरिक विविध कामानिमित्त याठिकाणी येत असतात.आठवडी बाजाराच्या दिवशी गर्दीत भर पडते.रस्त्यांची परिस्थिती पाहता नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे.त्याचबरोबर मुख्य मार्गावर असलेल्या बसस्थानक परिसरात सुद्धा अतिक्रमण पसरले आहे.
      मधूबन बेकरी पासून तर sbi बँक हा मार्ग वर्दळीचा असून याच ठिकाणी नालीवर मोठे अतिक्रमण करण्यात आले लहानमोठ्या वाहनांना रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.सध्या बससेवा बंद असल्याने याठिकाणी काळीपिवळी वाहनांनी कमालीचा हैदोस घातल्याचे चित्र पहायला मिळत नाही. अगोदरच हा मुख्यमार्ग अरूंद त्यावर अशी समस्या नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. नगरपरिषदेने सदर समस्येकडे लक्ष वेधून शहरातील अतिक्रमित रस्ते मोकळे करून नागरिकांना दिलासा द्यावा असे मत व्यक्त होत असून आता स्थानिक नगरपरिषद याकडे लक्ष देतील का? हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत