कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी
गोंडपिपरी:- महाराष्ट्राचे कृषिमंत्री आदरणीय नामदार दादा भुसे साहेब यांना भेटून धान उत्पादक शेतकऱ्याच्या समस्या आणि त्यांना दिलासा देण्यासाठी एकूण दहा मागण्याचा निवेदन देऊन साहेबांशी सविस्तर त्यावर थोडक्यात चर्चा केली त्यावर साहेबांनी आपल्या मागण्याचा गांभीर्यपुर्वक विचार करून धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आश्वासन दिले मागण्या मध्ये प्रमुख मागणी
1)धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति की. 1000 रुपये बोनस द्यावा,
2)अल्पभूधारक शेतकऱ्याचं पिक विमा शासनाने काढावा
3) चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना झटका मशीन 100% अनुदानावर द्यावी
4)औषध कंपन्यांना सरकारी नियंत्रणाखाली आणून औषधांचे दर ठरवावे अशा मागण्यासह एकूण दहा मागण्याचे निवेदन दिले.
यावेळी मंगेश पोटवार, सामाजिक कार्यकर्ते गौरव श्यामकुळे, टेकडीचे सरपंच सतीश चौधरी, उपसरपंच शंकर सिडाम, ग्रामपंचायत सदस्य अमित घडसे, सामाजिक कार्यकर्ते किसन गुरूनुले, आनंदराव गोहणे यावेळी उपस्थित होते.