तहसील कार्यालयासमोर निनादली पँथर ची डरकाळी #Sindewahi

Bhairav Diwase
सुनील गेडामला न्याय मिळालाच पाहिजे
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- -तालुक्यातील लाडबोरी येथिल रहिवासी सुनील गेडाम जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर समोर दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ पासून आपल्या न्यायोचित मागण्या घेऊन आमरण उपोषण करत आहेत. मात्र येथील प्रशासन शासन हे त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत.
त्यामुळेच सिंदेवाही तहसीलदार यांना जबाब विचारण्याकरिता तहसील कार्यालय सिंदेवाही येथे ऑल इंडिया पँथर सेना धडकली."सुनील गेडामला न्याय मिळालाच पाहिजे...मिळालाच पाहिजे" "होश मे आयो होश मे आयो होश मे आके बात करो."अश्या नाऱ्यानी तहसील कार्यालय परिसर दुमदुमला होता.या भूमिकेतून ऑल इंडिया पँथर सेनेने आपल्याकडे उपस्थित समस्त नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.ऑल इंडिया पँथर सेना ही दिनांक २९नोव्हेंबर२०२१ ला पँथर सेना तहसीलदार यांना जबाब विचारण्याकरिता त्यांच्या कार्यालयात पोहचली.तसेच तहसीलदार गणेश जगदाळे यांच्याशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली.
चर्चेत तहसीलदार साहेबांनी मी येऊन जिल्हाधिकारी यांच्या परवानगी घेऊन सुनील गेडाम यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्यांवर जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करून लवकरच त्यांना उपोषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे ऑल इंडिया पँथर सेनेला आश्वासन दिले.त्यावेळी उपस्थित ऑल इंडिया पँथर सेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा उपाध्यक्ष त्यागी देठेकर, जिल्हा युवाध्यक्ष अजय झलके, जिल्हा सल्लागार सुरेश डांगे, पोंभुर्णा तालुकाध्यक्ष सचिन आत्राम, सिंदेवाही तालुकाध्यक्ष आक्रोश खोब्रागडे, तालुका युवाध्यक्ष तथागत कोवले, तालुका कार्याध्यक्ष अंबादास दुधे, उपाध्यक्ष जितेंद्र नागदेवते, महेंद्र कोवले, तेजेंद्र नागदेवते, उपकार खोब्रागडे तथा समस्त पँथर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.